Wednesday, June 7, 2023

धक्कादायक! देशभर एनआयएचे छापे ; महाराष्ट्रातून एका महिलेला अटक

नवी दिल्ली | राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ने देशभर छापे मारले असून महाराष्ट्रातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.  आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून या महिलेला अटक करण्यात आली आहे.

 ‘आयएसआयएस’ भारतात घातपात घडवण्याच्या उद्देशाने आपले गुप्तहेर भारतात पेरत असावी. त्यांच्या हा मनसुब्यावर पाणी फेरण्यासाठी भारतीय तपास यंत्रणेने दक्ष राहून हि कार्यवाही केली आहे. या आधी हि भारतातून आयएसआयएसशी निगडीत असंख्य लोक पकडण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. त्याच प्रमाणे हैदरबाद शहरात देखील चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.