अजित पवारांनी स्वतःसाठी अनेक उत्पन्नाचे साधनं उभे केलेत, पण….; राणेंनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याला उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्याने इंधर दरवाढ कमी होणार नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी स्वतःसाठी अनेक उत्पन्नाचे साधनं उभे केलेत पण महाराष्ट्रासाठी दुसरे साधन उभे केले नाहीत अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

याबाबत निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही किती वर्ष आणि किती वेळा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री होतात व आहात तरी तुम्हाला उत्पन्नाचे इतर साधन तयार करता आले नाहीत, ही लाजिरवाणी बाब आहे. तुम्ही स्वतःसाठी अनेक उत्पन्नाचे साधनं उभे केलेत पण महाराष्ट्रासाठी दुसरे साधन उभे केले नाहीत. अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले-

राज्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन नाही, महाराष्ट्राला माहिती देतो की रोज ४५० कोटी रुपये हे पगार-पेन्शनला द्यावे लागतात, हा खर्च महिन्यातला दीड लाख कोटी रुपयांच्या पुढचा आहे, हा कुठेच थांबलेला नाही. तो करावाच लागतो. काही गोष्टी या अशा असतात की त्या थांबवता येत नाही “, असं सांगत इंधनाचे दर येत्या काळात कमी करण्याचा राज्य शासनाचा कोणताही विचार नसल्याचा सूर अजित पवार यांनी लावला.