हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० हुन अधिक समर्थक आमदारांसह बंड पुकारले. यामुळे शिवसेनेला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर आपण नाराज असून भाजपसोबत युती करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत युती नकोच अशी ठाम भूमिका शिंदेनी घेतली. याच वरून भाजप नेते निलेश राणे शरद पवारांवर निशाणा साधला.
50 आमदार/मंत्री मूळ घर सोडून वेगळे झाले कारण त्यांना काँग्रेस आणि पवार साहेब नको. 50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमवलं असे ट्विट करत निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
50 आमदार/मंत्री मूळ घर सोडून वेगळे झाले कारण त्यांना काँग्रेस आणि पवार साहेब नको.
50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमवलं.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) June 23, 2022
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्याजवळ ३७ पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. तसेच आज ते राज्यपालांची भेट घेऊन आपल्या गटाचा भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना केंदात आणि राज्यात मंत्रिपदाची ऑफर असल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील २ दिवस खूप महत्वाचे आहेत.