संजय राऊतांच्या अटकेनंतर निलेश राणेंकडून टीका; केला ‘तो’ व्हिडीओ ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतरही भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर केली जाणारी टीका काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. अशात भाजप नेते निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत राऊतांवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून अनेकवेळा राऊतांवर एकेरी भाषेत उल्लेख करत टीका करण्यात आली आहे. सध्या संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांनी कोर्टात सुनावणीवेळी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सोयीबाबत तक्रार केली होती. त्यानंतर कोर्टाने ईडीला चांगलेच फटकारले होते. कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर ईडीने राऊतांना सुविधा दिल्या आहेत. त्यामध्ये राऊतांना खिडकी असणारी खोली देण्यात आली आहे. या मुद्यांवरून निलेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

राणेंनी राऊतांचा खिडकी असलेल्या खोलीत बसलेला व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला असून त्या व्हिडिओत त्यांनी राऊत खोलीत बसून एका गाण्याची धून पेटीवर वाजवताना दिसत आहेत. त्या ट्विटला राणेंनी ‘जेलमध्ये खिडकी वाली खोली मिळाल्यावरचा आनंद,’ असे कॅप्शन दिले आहे.