टीम हॅलो महाराष्ट्र : मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये, अशी जहरी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या जय भगवान लिखित वादग्रस्त पुस्तकाचे तीव्र पडसाद सोशलमीडियावर उमटताना दिसत आहेत. यामध्ये नेते देखील मागे नाहीत. या प्रकरणावरून माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. .छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे द्यावेत या संजय राऊत यांच्या मतावर निलेश राणेंनी प्रहार केला आहे. Abp माझाचे ट्विट रिट्विट करत राणेंनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी म्हंटले की, मराठ्यांनी काय करावं हे पवारांच्या कुत्र्याने सांगू नये. जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या भावना दुखवल्या तेव्हा हा भाडखाऊ आगीत तेल ओतायला येतोच. कोणीही गोयलचं समर्थन केलेलं नाही पण ह्याला मराठ्यांमध्ये भानगडी लावायच्या आहेत.
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या जय भगवान लिखित पुस्तकात मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपमधील शिवाजी महाराजांच्या वंशजांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातील जनता बोलतेय, छत्रपतींच्या गादीच्या वारसदारांनी बोललंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी भाजपमधून राजीनामे द्यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. या मतांवर निलेश राणेंनी संजय राऊतांना लक्ष्य केले. त्यांनी राऊत यांचा उल्लेख पवारांचा कुत्रा असा केला आहे.