कोरोनानंतर आता देशावर नवं संकट; ‘निपाह व्हायरस’मुळे 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रदीर्घ काळानंतर देशात काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला असताना आता निफाह व्हायरस च नवं संकट उभे राहिले आहे. केरळमध्ये आता निपाह व्हायरसच्या संकटाचीही त्यात भर पडली आहे. 3 सप्टेंबरला केरळमध्ये 12 वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाली होती. आता त्या मुलाचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या रुग्णाच्या शरीरातील काही नमूने पुण्याच्या नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आले होते. त्यामध्ये त्याला निपाहची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे.

केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितलं की, या मुलाचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध घेणं सुरु आहे. कोझीकोडमध्ये 19 मे 2018 साली पहिल्यांदा निपाहचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर केरळमध्ये निपाह विषाणूमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

केंद्र सरकारकडून देखील याची पुष्टी झाली असून केंद्राचंही आरोग्य पथक केरळला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशी सर्व मदत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला करण्यात येईल असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

निपाह व्हायरसची लक्षणं काय आहेत-

ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे ही या आजाराची लक्षणं आहेत

Leave a Comment