“महाराष्ट्र सरकार विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते”; नितेश राणेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “या सरकारचे फक्त तीन घरांच्या लोकांमध्ये काय चाललंय याकडे सरकारचं लक्ष आहे. महाराष्ट्र सरकार विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते. सध्या महाराष्ट्रात राणे, मोहित कंबोल, किरीट सोमय्या यांच्यावरच फक्त कारवाई केली जात आहे. वास्तविक शिवसेना खासदार संजय राऊत हे चमकोगिरी करत आहेत,” अशी टीका राणे यांनी केली.

नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आजचा दिवस हा आमच्यासाठी खरच चांगला दिवस आहार. कारण आज सत्याचा विजय झाला आहे. अनेकवेळा सरकारविरोधी बोलणाऱ्या लोकांवर सुडबुद्धीने कारवाई होतेय, कधी वैयक्तिक केस टाकणे, कधी आमच्या घरांवर बीएमसीची नोटीस पाठवून कारवाईची भीती दाखवली जाते असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरु आहेत. आज पाहिले तर मुंबई महानगरपालिकेला मुंबईत आमच्याशिवाय दुसरे कुठलेच काम राहिलेले नसल्याचे दिसते.

सध्या मोजक्या दोन तीन घरांवर लक्ष ठेवण्यासाठीच मुंबई महापालिका चालवली जात आहे. आजच्या निकालाने मुंबई हायकोर्टाची मुंबई महापालिकेला चपराक बसली आहे. इक्बाल सिंह चहल यांचा मोबाईल चेक करण गरजेचे असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment