नितीन गडकरी YouTube द्वारे करतात दरमहा 4 लाख रुपयांची कमाई, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । YouTube द्वारे कमाईची उत्तम संधी आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती दरमहा मोठी कमाई करू शकते. अगदी राजकारण्यांपासून ते अभिनेते आणि सामान्य माणूससुद्धा YouTube द्वारे भरपूर कमाई करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील YouTube द्वारे दरमहा चार लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले की,”YouTube वर टाकलेल्या त्यांच्या भाषणांच्या व्हिडिओंसाठी त्यांना दरमहा 4 लाख रुपये रॉयल्टी म्हणून मिळतात.”

साथीच्या काळात, यूट्यूबवर पोस्ट केलेले त्यांचे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. भरूचमधील दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे (DME) च्या कामात झालेल्या प्रगतीचा आढावा घेताना गडकरी म्हणाले की,”त्यांच्या मंत्रालयाने रस्ते बांधकाम ठेकेदार आणि सल्लागारांना रेटिंग देणे सुरू केले आहे.”

गडकरी काय म्हणत आहेत?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की,” त्यांनी कोविड-साथीच्या काळात दोन गोष्टी केल्या.” ते म्हणाले की,” मी घरी कूक बनलो आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्याख्याने देण्यास सुरुवात केली. मी 950 पेक्षा जास्त व्याख्याने ऑनलाईन दिली. यात परदेशी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या व्याख्यानांचा समावेश आहे. जे YouTube वर अपलोड केले गेले.” ते म्हणाले,”YouTube चॅनेलवर माझ्या दर्शकांची संख्या खूप वाढली आहे आणि YouTube आता मला दरमहा चार लाख रुपये रॉयल्टी म्हणून देत आहे.” आपल्या स्पष्ट मतासाठी ओळखले जाणारे गडकरी म्हणाले की,” भारतात चांगले काम करणाऱ्या लोकांचे कौतुक होत नाही.”

या योजनांवर वेगाने काम सुरू आहे
आर्थिक वाढीसाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आधुनिक आणि उच्च दर्जाच्या रस्ते नेटवर्कचे महत्त्व यावरही मंत्री महोदयांनी भर दिला. ते म्हणाले की,” गुजरातमध्ये 35,100 कोटी रुपये खर्चून 423 किमीचा रस्ता तयार केला जात आहे.” गडकरी म्हणाले की,” या एक्सप्रेस वे अंतर्गत राज्यात 60 मोठे पूल, 17 इंटरचेंज, 17 फ्लायओव्हर आणि आठ रोड ओव्हर ब्रिज (ROB) बांधले जातील.” मंत्री पुढे म्हणाले की,” या द्रुतगती मार्गावर जागतिक दर्जाची वाहतूक सुविधा पुरवण्याव्यतिरिक्त, राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी रस्त्याच्या कडेला सुविधा इत्यादींशी जोडलेली 33 केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.”

Leave a Comment