…म्हणून आमदार, मंत्री ते मुख्यमंत्री, सगळेच टेन्शन मध्ये असतात; गडकरींची फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असतात. नुकतंच त्यांनी राजस्थान येथे विधानसभेत आयोजित परिसंवादात भाषण करताना जोरदार टोलेबाजी करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी आमदार, मंत्री, आणि मुख्यमंत्रीपण कायम दुःखी असतात अस विधान त्यांनी केले.

गडकरी म्हणाले, समस्या सर्वांसोबत आहे, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी आहेत. मंत्री झाले तर चांगलं खात मिळालं नाही म्हणून दु:खी आहेत. ज्या मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं ते मुख्यमंत्री होऊ शकलो नाही म्हणून दु:खी आहेत. आणि मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नाही,” असं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं.

राजकारण आणि लोकशाहीच्या मूल्यांवर भाष्य केलं. “राजकारणाचा मुख्य उद्धेश हा सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणं हा आहे. मात्र सध्याचं राजकारण केवळ सत्ता मिळवण्यासाठी सुरु असल्याचं दिसतं. लोकशाहीचं अंतिम ध्येय शेवटच्या व्यक्तीचा विकास आहे”, असं गडकरींनी सांगितलं.

You might also like