माण पंचायत समितीच्या सभापतीपदी नितीन राजगे यांची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

माण पंचायत समितीच्या सभापती लतिका विरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसभापती नितीन राजगे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. माण पंचायत समिताच्या सभापती पदासाठी अनेकदा नाट्यमय गोष्टी घडल्या आहेत.

यावेळी नितीन राजगे यांचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे, रमेश पाटोळे, विजयकुमार मगर, लतिका विरकळ, तानाजी काटकर, कविता जगदाळे, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्राबाई आटपाडकर या सर्व पंचायत समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

यावेळी सभापती नितीन राजगे बोलताना म्हणाले, माण पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य पर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी काम करणार आहे सहकारी पंचायत समिती सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. प्रशासकीय कर्मचारी यांना विश्वासात घेऊन चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत.

Leave a Comment