सातारा | लग्नात फ्रीज दिला नाही म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार देण्यात आलेली आहे. तेजश्री विशाल काटे (वय- 24, रा. फडतरवाडी, ता. सातारा. मूळ रा. कण्हेर खेड, ता. रहिमतपूर) यांच्या फिर्यादीवरून पतीसह 6 जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पती विशाल तानाजी काटे, सासरे तानाजी एकनाथ काटे, सासू मिना तानाजी काटे (सर्व रा. खेड, ता. सातारा), दीर गणेश तीलाजी काटे, जाऊ सोनाली गणेश काटे, मावस सासरे शिवाजी एकनाथ काटे (रा.मुंबई, मूळ) रा. कण्हेर खेड, रहिमतपूर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत विवाहिता तेजश्री काटे हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नात तुला फ्रिज दिला नाही. लग्नासाठी झालेल्या खर्चाचे पैसे तुझ्या आई वडिलांकडून घेऊन दे. गाडी घेण्यासाठी 3 लाख रुपये घेऊन ये. या कारणांसाठी दि. 28 जुलै 2017 पासून दि. 2 जुलै 2021 पर्यंत वरील संशयितांनी दहिसर मुंबई व रहिमतपूर येथे वारंवार छळ केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.