पुण्यात हेल्मेटसक्ती नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुख यांनी म्हटलय. त्यामुळे पुणेकरांना मास्कमुक्तीसोबतच हेल्मेट सक्तीतून काहीसा दिलासा मिळत आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरावे यासाठी त्यांना सुचना करण्यात आल्या असल्याचे देशमुख यांनी म्हणाले होते. शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रबोधन झाल्यावर सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन केले जाणार असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हेल्मेटच्या वापराबाबत जे आदेश काढण्यात आले होते, त्यामुळं पुण्यात सर्वसामान्यांना हेल्मेट सक्ती केल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून आता हेल्मेट सक्ती नसेल हे स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्के आहे.  त्यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुण्यात हेल्मेट सक्ती असणार नाही.