आई-वडिलांच्याकडून मुलीचा ताबा कोणीही घेऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आई – वडिलांची जागा एखाद्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते, असे खूपदा बोलले जाते. पण काही वेळेला या सुरक्षित जागेत काही लोकांना असुरक्षित भावना येऊ शकतात. अशीच एक घटना केरळमध्ये घडली आहे. केरळच्या एका कथित अध्यात्मिक गुरुने, त्याची लिव्ह-इन्-रेलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची आई-वडिलांच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने आई-वडिलांच्या सानिध्यातच मुलगी सुरक्षित राहू शकते, असा निर्णय दिला आहे.

केरळच्या कथित अध्यात्मिक गुरुने त्याची लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरला आई वडिलांच्या कैदेतून मुक्त करावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. त्यावर सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने निर्णय देताना अध्यात्मिक गुरूची याचिका खारीज केली. वरील याचिका खारीज करताना न्यायालयाने म्हटले आहे की, आई-वडीलांच्याकडे मुलीने राहणे म्हणजे तिचा ताबा ठेवणे नसून मुलगी ही आई-वडिलांच्याकडेच सुरक्षित राहील. यामुळे तिचा कोणीही ताबा मागू नये.

यापूर्वीही एकदा याच अध्यात्मिक गुरुने सर्वोच्च न्यायालयात त्याच्या पार्टनरच्या मुक्ततेसाठी याचिका दाखल केली होती. पण त्या वेळीही सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका खारीज केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याचिका खारीज करताना म्हटले होते की, ‘मुलीचे मानसिक आरोग्य ठीक नसून, यावेळी ती योग्य आणि अयोग्य काय याचा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे मुलीचे म्हणणे यामध्ये ऐकून घेतले जाऊ शकत नाही. यामुळे मुलीचा ताबा आई-वडिलांकडून काढून घेतला जाऊ शकणार नाही’.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment