आता नवे संकट… बूस्टर डोस घेऊनही होते आहे Omicron ची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जर तुम्ही विचार करत असाल कि कोरोना व्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेऊन आपल्या कोरोना पासून वाचता येईल तर असे नाही आहे. एका नन अभ्यासात हे उघड झाले आहे कि, बूस्टर डोस घेऊनही आपल्या कोरोना होऊ शकेल. या अभ्यासात असे दिसून आले आहे कि, कोरोना व्हॅक्सिनचे दोन डोस आणि बूस्टर डोस घेतलेल्यामध्ये चांगल्या अँटी बॉडीज तयार होतात. मात्र या अँटीबॉडीज फक्त कोरोनाच्या पहिल्या स्ट्रेन विरोधातच संरक्षण करण्यात मदत करतात. याचा ओमिक्रोन सारख्या व्हेरिएंटवर काहीच परिणाम होत नाही.

याचे एक ताजे उदाहरण सांगायचे झाले म्हणजे अमेरिकेच्या उप राष्ट्रपती असलेल्या कमला हॅरिस. हॅरिस यांनी दोन्ही डोस घेऊन बूस्टर डोस देखील घेतला आहे, मात्र तरीही त्यांना कोरोनाच्या ओमिक्रोनची लग्न झालीच.

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ मेडिसिनचे MD PHD प्रोफेसर असलेले जोएल ब्लॅकसन म्हणतात कि, पहिल्या निकालांद्वारे हे कळून येते कि, व्हॅक्सिनमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज या SARS-CoV -२ या स्ट्रेन पासून बचाव करण्यात मदत करतात. आमच्या या अभ्यासाद्वारे हे लक्षात येते कि या अँटीबॉडीज ओमिक्रोन विरोधात योग्यरीत्या काम करत नाहीत, ज्यामुळे संक्रमित होण्याचा धोका वाढतो.

यादरम्यान देशात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू लागला आहे. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम सारख्या शहरांमध्ये रोजच्या आकड्यांमध्ये जोरदार वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे देशात चौथ्या लाटेची शंका निर्माण होऊ लागली आहे.