आता प्रत्येक भारतीयांना मिळणार आधार कार्ड सारखा Unique Health ID, त्याअंतर्गत उपलब्ध होणार ‘या’ सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य नोंद (Health Record) ठेवण्यासाठी सुरू केलेली एक योजना ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ (NDHM) अंतर्गत आधार कार्ड सारख्या विशेष डिजिटल हेल्थ आयडीची (Digital Health ID) घोषणा केली आहे. या मिशन अंतर्गत, जर एखाद्या भारतीय नागरिकास त्याचे हेल्थ आयडी कार्ड घ्यायचे असेल तर त्याच्याकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही. 15 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NDHM सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशातील रूग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा या हेल्थ कार्डमध्ये जमा केला जाईल. यामुळे सहजपणे उपचारांची नोंद ठेवणे सुरक्षित राहील.

‘या’ सर्व सुविधा यूनिक हेल्‍थ आयडीमध्ये उपलब्ध असतील
हा हेल्थ आयडी तुमच्या प्रत्येक आजाराची नोंद ठेवेल. तसेच, तुम्ही किती वेळा डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे आणि उपचारादरम्यान तुम्हाला देण्यात आलेल्या औषधांची नोंददेखील या हेल्थ आयडीमध्ये असेल. पोर्टेबल असल्याने ही हेल्थ आयडी रूग्ण तसेच डॉक्टरांसाठीही उपयुक्त ठरेल. आपल्या हेल्थ आयडी कार्डमध्ये आधार आणि मोबाइल नंबरचा तपशील देखील असेल. हेल्थ आयडी कार्ड नंबर देखील प्रत्येक व्यक्तीसाठी आधार नंबरसारखा यूनिक असेल. NDHM मध्ये आपला हेल्थ आयडी, डिजिटल डॉक्टर, आरोग्य सुविधा रेजिस्ट्री, वैयक्तिक आरोग्याची नोंद, ई-फार्मसी आणि टेलिमेडिसिनचा समावेश असेल. एवढेच नव्हे तर राज्यातील लोकांच्या आरोग्याच्या आकडेवारीच्या आधारे सरकारसुद्धा चांगले आरोग्य कार्यक्रम तयार करु शकतील. या मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांनी म्हटले आहे की, NDHM कार्यक्रमातून चांगले आर्थिक परिणाम होतील.

> पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून सांगितले की, NDHM हे देशाच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती आणेल.

> NDHM अंतर्गत एक लाखाहून अधिक यूनिक हेल्‍थ आयडी तयार करण्यात आल्या आहेत. पायलट प्रोजेक्ट म्हणून सहा राज्यात ते सुरू झाले आहे.

> एका अहवालानुसार या डिजिटल हेल्थ मिशनमुळे देशातील जीडीपी वाढेल. येत्या 10 वर्षात GDP मध्ये 250 अब्ज डॉलर्सची भर पडेल.

> केंद्राने असे आश्वासन दिले आहे की, सुरक्षा लक्षात ठेवून हे डिजिटल हेल्थ रेकॉर्ड पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

> केंद्राच्या म्हणण्यानुसार या योजनेमुळे रूग्णाला चांगल्या सुविधा मिळतील आणि डॉक्टरांना योग्य उपचार करण्यास मदत होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment