आता फक्त कोरोनाची चर्चा बाकी, नंतर निर्णय घेतील; चंद्रकांतदादांनी उडवली खिल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लॉकडाऊन आणि राज्यातील जनतेला द्यावयाच्या पॅकेजबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांची कोरोनाशी चर्चा बाकी असेल. त्यानंतर ते निर्णय घेतील, अशा शब्दात चंद्रकात पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, मला कुणी तरी एक मेसेज पाठवला. सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. आता फक्त कोरोना अशी चर्चा बाकी आहे. त्यानंतर निर्णय घोषित केला जाईल, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं, असा टोला पाटील यांनी लगावला.

डोळे विस्फारतील असं पॅकेज देऊ असं एक वर्षापूर्वी कामगार मंत्री हसम मुश्रीफ म्हणाले होते. मात्र यातील फुटकी कवडीही कामगारांना दिली नाही, असा चिमटा त्यांनी मुश्रीफांना काढला. हा विषाणू लवकर संपणार नाही. काळजी घेऊन लोकांचं जनजीवन सुरळीत ठेवलं पाहिजे. प्रादुर्भाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. असंघटीत कामगारांना वर्षभरात काहीच पॅकेज देण्यात आलं नाही. त्यामुळे आता महिनाभर लॉकडाऊन करणार असाल तर कामगारांना रेशन, किराणा आणि भाजी मोफत देण्याची घोषणा करा. याची व्यवस्था न करता लॉकडाऊन करत असाल तर तो आम्हाला मान्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Comment