आता औरंगाबादहुन मुंबई, हैदराबाद, दिल्लीला चला विमानाने, कारण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्याची राजधानी औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. रेल्वेबरोबरच शहराला दिल्ली, मुंबई आणि हैदराबादबरोबर हवाई कनेक्टिव्हिटीदेखील आहे. अनेक जण या शहरांत कमी वेळेत पोहोचण्यासाठी विमानसेवेला प्राधान्यक्रम देत आहेत. कारण विमानाचे तिकीट हे रेल्वेच्या एसी भाड्याहून कमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विमानसेवेला काहीसा फटका बसला. परंतु दुसऱ्या लाटेनंतर औरंगाबादची विमानसेवा पूर्वपदावर आली. सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादशी विमानसेवेने जोडलेले आहे.

इंडिगोने 1 डिसेंबरपासून सकाळच्या वेळेत दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू केली. यामुळे दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य आहे. त्याबरोबरच दिल्लीहून कनेक्टिंग फ्लाईटने पाटणा, जयपूर, डेहराडून, श्रीनगर इ. ठिकाणी जाणेही शक्य झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा विमानसेवेला काही प्रमाणात फटका बसत आहे. या परिस्थितीला सामोरे जात विमानसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न विमान कंपन्या आणि विमान प्राधिकरणांकडून केला जात आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विमानसेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादची विमानसेवा पूर्ववत झाली. परंतु बंगळुरू आणि अहमदाबादची विमानसेवा सुरू होण्याची अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. ही दोन्ही विमाने लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

विमानतळावर येणाऱ्या विमानांची आगमन वेळ –
– इंडिगो दिल्ली-औरंगाबाद – सकाळी 7.15 वा.
– एअर इंडिया मुंबई-औरंगाबाद – सायं. 4.45 वा.
– इंडिगो हैदराबाद-औरंगाबाद – सायं. 5.05 वा.
-इंडिगो मुंबई-औरंगाबाद – सांय. 6.30 वा.
– इंडिगो दिल्ली-औरंगाबाद- सायं. 6.55 वा.
– एअर इंडिया दिल्ली- औरंगाबाद – सायं. 7.35 वा.

विमानतळावरून जाणाऱ्या विमानांची उड्डाणाची वेळ –
– इंडिगो औरंगाबाद- दिल्ली- सकाळी 7.45
-एअर इंडिया औरंगाबाद- दिल्ली- सायं. 5.20 वा.
– इंडिगो औरंगाबाद-हैदराबाद- सायं. 5.25 वा.
-इंडिगो औरंगाबाद-मुंबई- सायं. 7 वा.
– इंडिगो औरंगाबाद-दिल्ली- सायं. 7.30 वा.
– एअर इंडिया औरंगाबाद-मुंबई- रात्री. 8.20

Leave a Comment