आता सरकार दुकानदारांनाही देणार 3000 रुपये पेन्शन, अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. सरकारने छोट्या दुकानदारांसाठी नॅशनल पेंशन स्कीम (NPS) जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. यामध्ये रज‍िस्‍ट्रेशन करणाऱ्या व्यक्तीचे भविष्य सुरक्षित राहील.

‘या’ लोकांना मिळेल पेन्शन
या पेन्शन योजनेंतर्गत, रिटेल व्यापारी, दुकानदार आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान मासिक 3,000 रुपये पेन्शन मिळेल.

अटी काय असतील ?
यामध्ये रज‍िस्‍ट्रेशन करण्यासाठी व्यावसायिकाची वार्षिक उलाढाल दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही एक ऐच्छिक योजना आहे, ज्यामध्ये व्यावसायिकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा किमान 3,000 रुपये पेन्शन मिळेल.

अशा प्रकारे पेन्शनसाठी रज‍िस्‍ट्रेशन केले जाईल
18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पेन्शन योजनेत सामील होणारी लोकं देशभरात पसरलेल्या 3.25 लाख सामान्य सेवा केंद्रांवर रज‍िस्‍ट्रेशन करू शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिशय सोपा नियम करण्यात आला आहे. यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते आवश्यक असेल.

मृत्यूनंतर नॉमिनीला मिळेल पेन्शनचा लाभ
या योजनेंतर्गत रज‍िस्‍ट्रेशन करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या वतीने केलेल्या नॉमिनी व्यक्तीला (पती/पत्नी) अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम कुटुंबाला पेन्शन म्हणून दिली जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही http://Labor.gov.in आणि  http://maandhan.in वर लॉग इन करू शकता.

‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल
NPS नावनोंदणीसाठी, तुमच्याकडे आधार कार्ड आणि बचत बँक खाते, जन धन खाते क्रमांक असणे आवश्यक आहे.

Leave a Comment