PM Kisan Mandhan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना दरमहा मिळेल 3000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या तपशील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील सुमारे 10.07 कोटी कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवल्या जातात आहे. यामध्येच किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश आहे. ही योजना 2019 मध्ये लागू करण्यात आली. याबरोबरच केंद्र सरकारने आता 60 वर्षांवरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन देण्यासाठी पीएम किसान मानधन योजना सुरु केली आहे. याअंतर्गत 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये किंवा वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन दिली जात आहे. PM Kisan Mandhan Yojana

या योजनेमध्ये 18 ते 40 वय असलेली कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. मात्र यामध्ये त्यांना दरमहा 55 रुपये ते 200 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल जेणेकरून वयाच्या 60 वर्षांनंतर त्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळू शकेल. एका शेतकऱ्याला वयाच्या 18 व्या वर्षी 55 रुपये, तर 40 व्या वर्षी दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतात.

मात्र सरकारने यासाठी काही अटी देखील ठेवल्या आहेत. PM किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे शेतकरीही या योजनेमध्ये सामील होऊ शकतात. याअंर्तगत जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरीच लाभ घेऊ शकतात. या योजनेत PM किसान सन्मान निधी द्वारे मिळालेले 6000 रुपये थेट गुंतवण्याचा पर्याय निवडण्याची देखील सूट आहे. अशा प्रकारे शेतकऱ्याला त्याच्या खिशातून पैसे खर्च करण्याची गरज नाही.

Leave a Comment