आता तुम्ही घरबसल्या काढू शकाल PF चे पैसे, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भविष्य निधी ही एक सरकारी बचत योजना आहे जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवता. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी PF वरील व्याज दर दरवर्षी निश्चित केला जातो. रिटायरमेंटनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर, कर्मचाऱ्याला त्याच्या PF खात्यात जमा केलेली एकरकमी रक्कम मिळते. गरज पडल्यास तुम्ही तुमच्या PF खात्यातून पैसे काढू शकता.

सरकारच्या नवीन सुविधेनुसार, कर्मचारी कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीसाठी 1 लाख रुपये ऍडव्हान्स काढू शकतो. कोरोना व्हायरस व्यतिरिक्त इतर कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी PF चे पैसे काढता येतात. जरी ही सुविधा पूर्वी उपलब्ध असली तरी पूर्वी वैद्यकीय बिले भरावी लागायची.

आता या नवीन सुविधेअंतर्गत तुम्हाला वैद्यकीय बिले सादर करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त पैशासाठी अर्ज करावा लागेल आणि 3 दिवसांऐवजी 1 तासाच्या आत PF चे पैसे मिळतील.

PF बॅलन्स कसा तपासायचा ?
पैसे काढण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या PF खात्यातील बॅलन्स माहित असणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्याकडे ऍक्टिव्ह युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असणे आवश्यक आहे. UAN नंबरच्या मदतीने तुम्ही तुमचे PF खात्यातील बॅलन्स तपासू शकता.

सर्वप्रथम EPFO ​​च्या वेबसाईटवर जा. तुमचा UAN आणि पासवर्ड टाका. यानंतर तुम्ही PF खात्यातील बॅलन्स तपासू शकता. आपण स्टेटमेंट डाउनलोड देखील करू शकता.

या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Umang App डाउनलोड करून वेळोवेळी तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकता. आपण मेसेजिंगद्वारे किंवा मिस्ड कॉल करून खात्याचा तपशील देखील तपासू शकता. यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN ENG मेसेज 77382-99899 वर पाठवा. थोड्या वेळाने तुमच्या खात्यातील बॅलन्सचा मेसेज येईल.

तुम्ही 011-22901406 वर मिस्ड कॉल करून खात्यातील बॅलन्स तपासू शकता.

जर तुम्हाला तुमच्या PF खात्यातून पैसे काढायचे असतील तर तुम्ही यासाठी फिजिकल अर्ज किंवा ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकता.

आणि या सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे घरबसल्या ऑनलाइन पैसे काढणे. EPFO च्या वेबसाइटला भेट देऊन पैसे काढण्यासाठी, कोणत्याही एका माध्यमाचा वापर करावा लागेल.
– UAN द्वारे
– डिजिटल सिग्नेचरद्वारे
आधार कार्ड आणि पर्सनल डिटेल्सच्या आधारावर

PF ऑनलाइन मनी ट्रान्सफरसाठी फॉर्म 13 भरावा लागेल. पैसे काढण्यासाठी किंवा दाव्यासाठी, फॉर्म 31 भरावा लागेल. पेन्शनचे पैसे काढण्यासाठी फॉर्म 10 आणि PF सेटलमेंटसाठी फॉर्म 19 भरावा लागेल.

ऑनलाइन पैसे काढण्यासाठी
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट http://epfindia.gov.in वर जावे लागेल.
येथे UAN आणि पासवर्ड टाकून आपले खाते लॉगिन करा.
ऑनलाईन सर्विसेज टॅबवर जा आणि क्लेम फॉर्म निवडा (फॉर्म -31, 19 किंवा 10 सी)
तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक एंटर करा आणि त्याची पडताळणी करा
Proced to Online Claim वर क्लिक करा
ड्रॉप डाऊनमधून PF Advance निवडा, पैसे काढण्याचे कारण निवडा
त्यानंतर रक्कम एंटर करा, चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि तुमचा ऍड्रेस एंटर करा
Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि मोबाईल वर मिळालेला OTP एंटर करा
OTP प्रविष्ट केल्यानंतर, तुमचा PF क्लेम ऑनलाईन रजिस्टर्ड होईल.

या प्रक्रियेच्या काही काळानंतर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात ट्रांसफर केले जातील.

You might also like