NPS: दरमहा 5000 रुपये गुंतवून रिटायरमेंटनंतर मिळवा 22,000 रुपयांची पेन्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिटायरमेंटनंतर तुम्हाला पैशाची कोणतीही अडचण येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये गुंतवणूक करावी. यामध्ये आपली गुंतवणूक फक्त सुरक्षितच राहत नाहीत तर ते चांगला रिटर्नही देते. हेच कारण आहे की, आता सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बहुतेक लोकं पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक करू इच्छितात, जेणेकरून रिटायरमेंटनंतर पैशाची समस्या उद्भवू नये.

ही योजना 2004 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि पूर्वी फक्त सरकारी कर्मचारीच यामध्ये गुंतवणूक करू शकत होते मात्र 2009 मध्ये ती सर्वांसाठी खुली करण्यात आली. NPS मध्ये रिटायरमेंटपर्यंत योगदान दिले जाते. रिटायरमेंटच्या वेळी म्हणजेच वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर, जमा झालेल्या निधीचा काही भाग एकरकमी काढता येतो. उर्वरित रकमेतून तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न मिळू शकते.

NPS मधील गुंतवणुकीवर कर सवलती देखील उपलब्ध आहेत. तुम्ही नोकरी करत असाल तर, कलम 80CCD (1B) अंतर्गत NPS मध्ये गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक 50,000 रुपयांच्या कर कपातीसाठी पात्र होऊ शकता. 80C अंतर्गत उपलब्ध असलेल्या 1,50,000 लाख रुपयांच्या वजावटीपेक्षा हे वेगळे आहे.

कोण गुंतवणूक करू शकतो ?
18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणीही NPS मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकते. NPS मधील गुंतवणूक पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे नियुक्त केलेल्या पेन्शन फंड मॅनेजर्सद्वारे व्यवस्थापित केली जाते. PFRDA ही नॅशनल पेन्शन स्कीमची रेग्युलेटर आहे. तुम्ही एकूण 7 पेन्शन फंड मॅनेजर्सपैकी कोणताही एक निवडू शकता. वयाच्या 60 वर्षापर्यंत पेन्शन फंडात गुंतवणूक करता येते. यानंतर तुम्हाला अ‍ॅन्युइटी प्लॅन घ्यावा लागेल. सहा अ‍ॅन्युइटी प्रोव्हायडर्सपैकी कोणत्याही व्यक्तीकडून अ‍ॅन्युइटी योजना खरेदी करता येते. फक्त अ‍ॅन्युइटी प्रोव्हायडर तुम्हाला दरमहा पेन्शन देतील.

5,000 रुपयांची गुंतवणूक
जर एखाद्या 30 वर्षांच्या व्यक्तीने दरमहा NPS मध्ये फक्त 5,000 रुपये गुंतवले तर त्याला रिटायरमेंटनंतर दरमहा 22,279 रुपये पेन्शन मिळू शकतात. याशिवाय त्याला 45 लाख रुपयांची एकरकमी रक्कमही मिळणार आहे. वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला 5,000 रुपये जमा करावे लागतील. या अंदाजासाठी 10 टक्के वार्षिक व्याज दर आणि 6 टक्के अ‍ॅन्युइटी दर गृहीत धरण्यात आला आहे.

Leave a Comment