अमित शहांना दाखवले काळे झेंडे, NSUI च्या कार्यकर्त्यांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचे पुण्यात आगमन झाले असता, विद्यार्थी काँग्रेसने शहांना काळे झेंडे दाखवले. महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमीर शेख यांच्या सहित इतर बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केले, व स्वारगेट पोलीस ठाण्याला नेले आहे.

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हिराबाग चौकात एनएसयुआयने (NSUI) ‘अमित शहा गो बॅक’, ‘नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा दिल्या आणि शहांना काळे झेंडे दाखवले.

निदर्शने करणाऱ्या महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अमीर शेख, पुणे विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष भूषण रानभरे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहन शेट्टी यांना पोलिसांनी अटक केली.

Leave a Comment