Wednesday, June 7, 2023

कोरोना संसगार्चा वेग वाढला; मृत्यूदरही वाढल्याने चिंता

औरंगाबाद – शहरात करोनाबाधितांचे प्रमाण वाढत चालले आहे. पालिकेकडून मिळालेल्या अहवालानुसार शंभर चाचण्यांमागे ३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघत आहेत. पॉझिटिव्हिटी दराबरोबरच मृत्यूदरही वाढला आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण काही दिवसांपूर्वी ९६ टक्क्यांवर होते, ते आता ८० टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.

५ मार्चपासून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पाच-सहा दिवसांपासून तर रोज हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी सर्वाधिक म्हणजे १६७९ रुग्ण आढळून आले. पालिकेच्या अहवालानुसार, करोना आजाराचा पॉझिटिव्हिटीचा दर ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. शंभर व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली तर त्यातील ३२ व्यक्ती पॉझिटिव्ह निघत आहेत.

औरंगाबाद शहराच्या बाबतीत आतापर्यंतचा हा सर्वांत जास्त पॉझिटिव्हिटी दर आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ४५८ असून, त्यापैकी ८१४० रुग्ण शहरातील आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मृत्यूदरही गेल्या काही दिवसांत कमी झाला आहे. ३ दिवसांत ४0 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनामुक्तीचे प्रमाण देखील ९६ टक्क्यांवरून ८०.२६१ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे यंत्रणा चिंतेत सापडली आहे.

दोन हजार ६१७ रुग्ण गृह विलगीकरणात

पालिकेने गृह विलगीकरणाची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने ६0 वर्षांखालील कोरोनाबाधितांना ही सुविधा दिली जात आहे. पालिकेच्या शनिवारच्या अहवालानुसार आतापर्यंत दोन हजार ६१७ रुग्ण गृह विलगीकरणामध्ये आहेत.

२१ दिवसांत १५१ रुग्ण दगावले

कोरोनामुळे १ मार्च ते २१ मार्च रात्रीपर्यंत जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल पाहिला तर १५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ मार्च रोजी ३ रुग्णांचा मृत्यू झाले. तर तीन तारखेला ७ रुग्ण कोरोनामुळे दगावले. याशिवाय ४ तारखेला १ रुग्ण, ५ तारखेला ५, ६ तारखेला ५, ७ ला ३, ८ तारखेला ४, ९ तारखेला ८, १० तारखेला ७, ११ तारखेला ९, १२ तारखेला ६, १३ तारखेला ८, १४ तारखेला ५, १५ तारखेला ५, १६ तारखेला  ७, १७ तारखेला १७ आणि १८ मार्च ला १५, १९ मार्च रोजी ५, २० तारखेला २० आणि २१ तारखेला ११ असे एकूण २१  दिवसांत तब्बल १५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group