धक्कादायक! कोरोनाबाबत जागृती करणार्‍या नर्सची तरुणांनी दुचाकी जाळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | कोरोनाबाबत जागृती करणार्‍या नर्सची दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरात घडला आहे. एकत्र खेळू नका कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशी सूचना करणाऱ्या परिचारिकेची व तिच्या पतीची दुचाकी काही तरुणांनी जाळण्याचा प्रकार कुंभारी  येथील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत येथे घडला आहे.

मार्कंडेय सहकारी रुग्णालयातील परिचारिका सुरेखा श्रीशैल पुजारी (वय 30) या गुरुवारी पती श्रीशैल पुजारी (वय 32, रा.817/4, गोदूताई विडी कामगार वसाहत) यांच्याबरोबर रुग्णालयाला कर्तव्यावर जात होत्या. गोदूताई घरकुलच्या मोकळ्या मैदानावर काही तरुण सोशल डिस्टन्स न ठेवता खेळत होते. त्यांना पुजारी दाम्पत्याने, कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, रुग्णांची संख्या 12 झाली असून, त्यातील एकाच मृत्यू झाला आहे, आता तरी तुम्ही असे मैदानात एकत्र खेळू नका, अशी सूचना केली. त्यावर काही तरुणांनी, तू दररोज मार्कंडेय हॉस्पिटलला जातेस तुझ्यामुळे कोरोना येत नाही का, असं म्हणत, तुला बघून घेतो, अशी दमदाटी केली. यामुळे पुजारी दाम्पत्याने  कुंभारी पोलिस चौकीमध्ये तक्रार केली, मात्र कोणीही पोलीस आले नाहीत.

दरम्यान, शुक्रवारी (ता. 17) पहाटे 2 वाजता अज्ञात समाजकंटकांनी शुक्रवारी पहाटे 2 वाजता सुरेखा पुजारी यांची दुचाकी (एमएच 13- 6155) आणि त्यांच्या पतीची दुचाकी (एमएच 13 सी 4213) या दोन्ही गाड्या पेट्रोल टाकून जाळल्या. याबाबत गोदूताई परुळेकर पोलीस चोकीला माहिती दिली असता, पोलिसांनी घटनेची छायाचित्रे घेऊन, पुजारी यांना वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. याबाबत फिर्याद देण्यास पुजारी दाम्पत्य वळसंग पोलीस ठाण्यात गेले असता, अधिकारी शुक्रवारी सकाळी हजर नसल्याने सकाळी गुन्हा होण्यास सुरवातही झाली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण

२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांना ‘ही’ महत्त्वाची सूचना; म्हणाले..

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी सुरू केला तपास

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in

Leave a Comment