महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवून नातेवाईकांना पाठवले त्याचे अश्लील फोटो,सहकाऱ्यावर गुन्हा दाखल

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – एका कंपनीत आपली सहकारी असलेल्या महिलेचे अश्लील फोटो काढून ते तिच्या नातेवाईकांला पाठवून तिची बदनामी करण्यात आली. या प्रकारामुळे त्या तरुणाविरोधात कळमनुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सर्वप्रथम त्या तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर त्या मुलीच्या संमतीशिवाय तिचे अश्लील फोटो काढले आणि हे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवत तिची समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कळमनुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
काही दिवसांपूर्वी कळमनुरी तालुक्यातील एक महिला कुटुंबीयांसोबत पुण्यात कामानिमित्त आली होती. या दरम्यान पुण्यातील एका कंपनीत काम करत असताना तिची ओळख सागर सुनील मोरे याच्याशी झाली. आधी त्यांच्यात मैत्री झाली नंतर त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. यानंतर आरोपीने त्या पीडित महिलेशी शारीरिक संबंध ठेवले आणि तिच्या संमतीविना तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढले.

आरोपी सागर सुनील मोरे एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली. यानंतर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने कळमनुरी पोलीस ठाण्यात सागर सुनील मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सागर सुनील मोरे याला अजून अटक करण्यात आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

You might also like