धक्कादायक! पोस्टमन निघाला करोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेले हजारो नागरिक ‘सेल्फ क्वारंटाइन’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत असतांना आता ओडिशामध्ये एका पोस्टमन करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमनला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ओडिशा सरकारने भुवनेश्वरमधील हजारो नागरिकांना ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्रानं वृत्त दिलं आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, करोनाची लागण झालेला पोस्टमन १० मार्च रोजी दिल्लीहून परतला होता. संबंधित पोस्टमन बीजीबी नगर सब-पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असल्याची माहिती भुवनेश्वरचे महानगरपालिका आयुक्त पी.सी. चौधरी यांनी दिली. “संबंधित पोस्टमनने लॉकडाउनच्या दहा दिवसांमध्ये गौतम नगर, सत्र न्यायालय यांसारख्या दररोज वकील किंवा पोलिसांची गर्दी असलेल्या भागांमध्ये पत्रांचं वाटप केलं आहे.

त्यामुळे त्या पोस्टमनशी संपर्कात आलेल्या संबंधित परिसरातील नागरिकांनी स्वतःला क्वारंटाइन करावे, त्यांनी घराबाहेर पडू नये. तसेच शक्य असल्यास १०४ क्रमांकावर संपर्क साधून स्वतःची नोंदणीही करावी”, असं आवाहन पी.सी. चौधरी यांनी केलं आहे. अधिक खबरदारी म्हणून पुरी जिल्हा प्रशासनाने शनिवारी भुवनेश्वरपासून जवळच असलेले पोस्टमनचे गाव सील केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment