अरे व्वा! ‘बिग बॉस मराठी ३’लवकरच येणार; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखेर प्रतीक्षा संपणार आणि मराठी ‘बिग बॉस ३’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला. येणार येणार म्हणत गेले कित्येक दिवस प्रेक्षकांची उत्सुकता ताणलेला मराठी बिग बॉसचा आगामी तिसरा सीजन आता लवकरच येणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर या सिजनमध्ये कोणकोण सहभागी होणार आहेत याबाबत अनेको चर्चा सुरु झाल्या आहेत. या सिजनची घोषणा महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

कलर्स मराठीवर लोकप्रिय झालेल्या बिग बॉस मराठीच्या पुढच्या म्हणजेच तिसऱ्या सिझनची घोषणा गेले दोन सिझन या शोचे होस्ट असणाऱ्या अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट टाकत केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, त्याच्यासोबत मी परत येतोय तुम्ही तयार राहा. या त्यांच्या घोषणेमुळे लवकरच बिग बॉस मराठीच्या घराचे दार हे नव्या आव्हानांसाठी आणि नव्या चेहऱ्यांसाठी लवकरच उघडणार आहे यात काही वादच नाही. महेश मांजरेकरांच्या या पोस्टमुळे चाहते अत्यंत आनंदी आहेत इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर हि पोस्ट चांगलीच वायरल होत आजगे आणि लोकांमधील उत्सुकता अगदी स्पष्ट दिसून येत आहे.

गेल्या सीजननंतर दिड वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे आणि लॉकडाऊन सुरू असल्याने कोणताही नवा आणि रंजक असा रिऍलिटी शो सुरू झाला नव्हता. यामुळे संपूर्ण वर्ष कस सून सून गेलं. त्यामुळे प्रेक्षकांचा अत्यंत लोकप्रिय असणारा बिग बॉसचा सिझन ३ कधी येणार अशी सारेच आ वासून प्रतीक्षा करत होते. यानंतर अलीकडेच नियमांमध्ये थोड्या फार प्रमाणात शिथिलता आल्याने मुंबईतील चित्रिकरणास हळू हळू का होईना पण सुरवात झाली आहे. शिवाय बिग बॉसचा सेटदेखील मुंबईतील फिल्मसिटीटच उभारणार असल्याची माहिती आहे. थोड्याच दिवसात या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी असतील हे देखील स्पष्ट होईल आणि लवकरच बिग बॉसचा सिझन ३ कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येईल.

You might also like