Ola Electric Bike : E- Scooter नंतर OLA आणणार इलेक्ट्रिक Bike; कधी होणार लॉन्च?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी (Ola Electric Bike) इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक आता लवकरच नवीन बाईक आणण्याच्या तयारीत आहेत. कंपनीच्या सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत ट्विट करत संकेत दिले आहेत. अग्रवाल यांनी एक पोस्ट करत तुम्हाला कोणती बाईक आवडते? असा सवाल केला आहे तसेच ४ गाड्यांचे पर्यायही दिले आहेत.

कधी होणार लॉन्च?- (Ola Electric Bike)

ओला आपली नवीन इलेक्ट्रिक (Ola Electric Bike) बाइक पुढील वर्षी मार्च महिन्यात होळीपर्यंत आणू शकते. कंपनीकडून असे संकेत देण्यात आले आहेत की ओला या होळीला आपली आगामी मोटारसायकल लॉन्च करण्याचे आश्वासन देत आहे. ओला खरोखरच देशातील सर्वात परफॉर्मन्स चालविणारी, व्यावहारिक आणि टिकाऊ मोटरसायकल बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. या बाइकचं डिझाईन कसं असेल किंवा किंमतीबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर (Ola Electric Bike) एक पोस्ट करत प्रश्न केला आहे. तुम्हाला कोणती बाईक आवडते? असा सवाल करत त्यांनी यावेळी यूजर्सना स्पोर्ट्स बाईक, क्रूझर, अॅडव्हेंचर बाईक आणि कॅफे रेसर असे चार पर्याय दिले आहेत. यावर लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत काही पर्याय निवडले आहेत. यापैकी सर्वाधिक ४७.१ टक्के मते स्पोर्ट्स बाईकसाठी पडली आहेत. यानंतर क्रुझर बाईक दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याला आतापर्यंत 27.7 टक्के मते मिळाली आहेत. 15.1 मतांसह अॅडव्हेंचर तिसऱ्या क्रमांकावर असून कॅफे रेसर बाईक 10.1 टक्के मतांसह शेवटच्या स्थानावर आहे.

हे पण वाचा :

Jawa 42 Bobber : दमदार लूक आणि फीचर्ससह लॉन्च झाली Jawa 42 Bobber; पहा किंमत

Zontes 350R : भारतात लॉन्च झाली Zontes 350R स्ट्रीटफायटर बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ola S1 Air : Ola ची सर्वात स्वस्त Electric Scooter लॉन्च; पहा वैशिष्ठ्ये आणि किंमत

Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग