Ola S1 Pro vs Honda Activa 6G : कोणती गाडी खरेदी करणे फायद्याचे? किंमत अन् फिचर्स तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ola S1 Pro vs Honda Activa 6G : सध्याच्या महागाईच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतच आहेत. अशातच अनेक कंपन्यांकडून आता इलेक्ट्रिक गाड्या लाँच केल्या जात आहेत. ज्यासाठी ग्राहकांकडून मागणी देखील मिळत आहेत. यासाठी Okinawa, Ola, Ather या कंपन्या आघाडीवर आहेत. तर हे लक्षात घ्या कि, Ola S1 Pro ही सध्याच्या काळात लोकप्रिय ठरलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर पैकी एक आहे तर Honda Activa ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या नियमित स्कूटरपैकी एक आहे. चला तर मग तर आज आपण Ola S1 Pro आणि Honda Activa 6G या गाड्यांबाबत जाणून घेउयात…

Ola S1 or Honda Activa? The apple vs orange debate you need to read | Bike News

स्पेसिफिकेशनची तुलना

Ola च्या S1 Pro या इलेक्ट्रिक गाडीमध्ये 3.97 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो 181 किमीपर्यंतचा सपोर्ट देतो. याची एकूण पॉवर आणि टॉर्क आउटपुट अनुक्रमे 11.4 hp आणि 58 Nm आहे. तसेच यामध्ये इको, नॉर्मल आणि हायपर असे तीन प्रकारचे ड्राइव्ह मोड देखील देण्यात आले आहेत. याद्वारे फक्त 15 मिनिटांतच 75 किमी पर्यंतचा पल्ला गाठता येईल. ही गाडी 125 किलोग्रॅमवर ​​स्केल टिपते आणि जास्तीत जास्त स्पीड 116 किमी/तास आहे. Ola S1 Pro vs Honda Activa 6G

तर दुसरीकडे, Honda Activa 6G मध्ये 109.51 cc इंजिन आहे, जे मजबूत 7.79 PS आणि 8.84 Nm पीक पॉवर आणि टॉर्क देते. हे इंजिन CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले गेलेले आहे. याच्या इंधनाची टाकी देखील रेग्युलर आकाराची असून ती 5.3 लीटरपर्यंत सपोर्ट देईल. तसेच या गाडीचा मायलेज सुमारे 50 किमी/ली असून वजन 111 किलो इतके आहे. Ola S1 Pro vs Honda Activa 6G

Ola S1 Pro vs Honda Activa 6G Comparison

फीचर्सची तुलना

Ola S1 Pro च्या फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये MoveOS 2 ऑपरेटिंग सिस्टीम, एलईडी टर्न सिग्नल, 36 लिटरचा अंडरसिट स्टोरेज, अँटी थेफ्ट अलार्म, इन-बिल्ट स्पीकरद्वारे म्युझिक प्लेबॅक, एक पॅसेंजर फूटरेस्ट यांसारखे अनेक ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच यासोबत मोबाइल ऍप कनेक्टिव्हिटी, 7-इंची टचस्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल,ब्लूटूथ आणि नेव्हिगेशन देखील देण्यात आले आहेत. यामध्ये स्टोरेजची कॅपॅसिटी देखील बऱ्यापैकी आहे. तसेच ही गाडी 10 रंगांमध्ये ऑफर केली जाते आहे. Ola S1 Pro vs Honda Activa 6G

Honda Activa 6G च्या फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये LED टर्न सिग्नल लॅम्प, ओडोमीटर, पॅसेंजर फूटरेस्ट, कॅरी हुक, सीट ओपनिंग स्विच, एक्सटर्नल फ्युएल फिलिंग, टॅकोमीटर आणि ट्रिप मीटर यासारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच ही गाडी 9 रंगांमध्ये ऑफर केली जाते आहे.

Ola's sub-Rs 1 lakh scooters' sale reaches 10,000 unit within 24 hours

किंमतींबाबत जाणून घ्या

Honda Activa 6G च्या किमतींबाबत बोलायचे झाल्यास या गाडीची एक्स-शोरूम किंमत ही 72,400 ते 75,400 रुपये असेल. ज्यामुळे अल्पावधीतच ही गाडी लोकप्रिय ठरली आहे. तसेच दुसरीकडे, Ola S1 Pro च्या किंमतींबाबत बोलायचे झाल्यास या गाडीची एक्स-शोरूम किंमत ही 1.48 लाख रुपये इतकी आहे. मात्र, सरकार कडून देण्यात येणारी सबसिडी आणि इतर इन्सेन्टिव्हमुळेही 1 लाख रुपयांच्या आसपास मिळेल. Ola S1 Pro vs Honda Activa 6G

Honda Activa 6G vs Ather 450X- Price, Cost of Driving, Comfort, Practicality, Availability

कोणत्या ग्राहकाने कोणती गाडी खरेदी करावी ???

ज्या ग्राहकांना आकर्षक किंमतीत चांगले फीचर्स असलेली आणि चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या कंपनीची गाडी हवी असेल त्यांच्यासाठी Honda Activa 6G योग्य आहे. आता येत्या काही दिवसांत Honda Activa 7G देखील येत आहे. मात्र, जर आपण इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे वैतागला असाल किंवा प्रीमियम आणि टेक फीचर्स असलेली गाडी हवी असेल तर Ola S1 Pro हा एक उत्तम पर्याय ठरेल. Ola S1 Pro vs Honda Activa 6G

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://olaelectric.com/s1

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर