सलाम ! महिलेनं स्वतः कर्ज काढून उभारलं भव्य वृद्धाश्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिवणकाम करत फाटलेल्याला माणुसकीला टाके घालण्याचा प्रयत्न

सांगली प्रतिनिधी प्रथमेश गोंधळे

आजच्या पिढीला वयोवृद्ध माणसं आजच्या तरुणाईला सांभाळायला नको नकोशी वाटतायत. पण भावना व समाजसेवेन झपाटलेली मूलखावेगळी काही माणसही याच समाजात आजही आहेत. आपली झोळी फाटकी असताना सुद्धा पै न पै गोळा करुन समाजाचं ऋण फेडल आहे. एका कर्तबगार महिलेनं. तिच्यातील जिद्द आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याने एक स्वप्न त्यांनि पूर्ण केल आहे. तासगाव तालुक्यातील सावर्डे येथील सविता संजय कांबळे या महिलेनं वृद्धांप्रती असलेल्या भावना जपण्यासाठी कर्ज काढून स्वतः वृद्धाश्रम उभारलंय. कुठलं अनुदान, किंवा देणग्या गोळा करण्यासाठी नव्हे तर फक्त वयोवृद्ध व निराधार लोकांना आधार देण्यासाठी आहे अस त्या आवर्जून सांगतात. आज माणसाला माणसासाठी वेळ नाही पण सविताताई घरी शिवणकाम करत करत फाटलेल्या नात्यांना माणुसकीचे टाके घालण्याचा स्तुत्य प्रयत्न करत आहेत.

लहानपणापासून सामाजिकतेची आवड असणाऱ्या व सावर्डे येथे राहणाऱ्या सविताताई या घरी शिवणकाम करतात. तीन मुल, त्यात दोन मुली उच्च शिक्षण घेणाऱ्या, दहा गुंठे जमीन, परिस्थितीही तशी बेताचीच. पण म्हाताऱ्या माणसांबद्दल असणाऱ्या भावना, माणुसकी व कायतर करायच हा आतला आवाज स्वस्थ बसू देत नव्हता. माहिती काहीच नाही. काही वृद्धाश्रम जाऊन पाहिले. तिथं काय काय केलं जातं. माणसांना कसं सांभाळलं जात. याची माहिती त्यांनी घेतली. २०१३ साली सामाजिक संस्थेच्या नावं नोंद केली. कागदोपत्री सर्व तयार झालं पण पैशाच सोंग आणता येत नाही. आपल्याला आवडणाऱ काम करायला पैसा नाही म्हणून थांबायच नाही,मग काय बँकेकडून ९० हजारांच कर्ज घेतलं .

स्वतःताची दहा गुंठे असणाऱ्या जमिनीत बांधकाम सुरू केलं. सविताताई यांच्या कष्टातुन दोन महिन्यांपूर्वी तासगाव तालुक्याच्या मातीत पहिलं उभं राहिलं विमल आई वृद्धसेवाश्रम सह अनाथ संगोपन केंद्र. या वृद्धाश्रमाचं उद्घाटन करायला गावातील अनेक मान्यवर मंडळी आली त्यांनी आपल्या आपल्या परीने मदत करू अस आश्वासन दिलं. कवठेमहांकाळ तालुक्यातील विमल वाघमारे या सविताताई यांच्या आई. अपार कष्ट करून त्यांनी मुले वाढवली. मोठी केली. अनेक यातना सोसल्या. आईच्या कष्टाची परतफेड व सन्मान म्हणून त्यांनी विमल आई वृद्धसेवाश्रम सह अनाथ संगोपन केंद्राला नाव देऊन केला.
या कार्यसाठी त्यांचं सर्वस्तरातून कौतुक केल जात आहे.

Leave a Comment