व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जगातील सर्वात वयस्क रॉयल बंगाल टायगर ‘राजा’चा मृत्यू; मरण्याअगोदर नावावर झाला ‘हा’ विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि जगातील सर्वात वृद्ध रॉयल बंगाल टायगर ‘राजा’चा (royal bengal tiger raja dies) सोमवारी मृत्यू झाला. राजा (royal bengal tiger raja dies) याचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले. राजा (royal bengal tiger raja dies) वाघला पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं होतं. राजा हा देशातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या वाघांपैकी एक होता. रॉयल बंगाल टायगर राजाचे (royal bengal tiger raja dies) वय 26 वर्षे 10 महिने 18 दिवस होते आणि तो 23 ऑगस्ट रोजी आपला 27 वा वाढदिवस साजरा करणार होता. पण वाढदिवसाच्या 40 दिवस आधी त्याने जगाचा निरोप घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 3 वाजता राजा (royal bengal tiger raja dies) वाघाचा मृत्यू झाला. वृद्धापकाळामुळे राजा गेल्या काही दिवसांपासून अन्न खात नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. राजाच्या (royal bengal tiger raja dies) मृत्यूनंतर अलीपूरद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र कुमार मीना, वन संचालनालयाचे अधिकारी दीपक एम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॉयल बंगाल टायगर राजाला श्रद्धांजली वाहिली.

2006 मध्ये राजाला (royal bengal tiger raja dies) सुंदरबनमधून जखमी अवस्थेत पकडण्यात आले होते. नंतर त्यांना पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील व्याघ्र पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. सुंदरबनमधील माताळा नदी ओलांडत असताना राजावर (royal bengal tiger raja dies) मगरीने हल्ला केला ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. राजा वाघाने मरण्याअगोदर सर्वाधिक काळ जगण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर