व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधवांवर राज्य सरकारकडून अन्याय

रणजित जाधवांचे कराडात लाक्षणिक उपोषण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

देशाला पहिले ऑलम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी कार्वे नाका- कराड येथील ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव चौकात आजपासून लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला. देशाला पहिले ऑलम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावर वारंवार शासनाकडून अन्याय केला जात आहे. त्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्याबरोबर गोळेश्वर येथे मंजूर असलेल्या पाच कोटी रुपयाच्या स्मारकाचा प्रश्न बारा वर्ष झाले प्रलंबित असल्याचेही जाधव याने यावेळी सांगितले.

भारताला पहिले ऑलम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याची कामगिरी महाराष्ट्राच्या सुपुत्राने ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी केली. मात्र, त्यांच्यावरच राज्य सरकारकडून वारंवार अन्याय केला जात असल्याचा आरोप खुद्द त्यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी केला आहे. या विरोधात जाधव यांनी उपोषण सुरु केले असून ते म्हणाले की, माझे वडील ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलम्पिकमध्ये पदक मिळवून दिले आहे. मात्र, त्यांच्यावर वारंवार राज्य शासनाकडून अन्याय केला जात आहे. मी वडिलांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्याबरोबरच गोळेश्वर येथे मंजूर असलेल्या पाच कोटी रुपयाच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी बारा वर्ष झाली मागणी करीत आहे. मात्र, या मागण्यांकडे राज्य शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

अनेकवेळा मागणी करूनही याकडे राज्य शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या मागण्या पूर्ण करण्यासाठी ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांचे कार्वे नाका- कराड येथील स्मारक असलेल्या चौकात लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत राज्य शासनाकडून मागण्यांबाबत दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार असल्याचे रणजित जाधव यांनी सांगितले.