धोक्याची घंटा!! देशात ओमिक्रोन रुग्णसंख्या 159 वर तर महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आफ्रिकेतून देशभर पसरलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्ट ने भारतात हातपाय पसरले असून देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आत्तापर्यंत देशातील रुग्णसंख्या 159 वर पोचली असून महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण असल्याने ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 54 रुग्ण

ओमिक्रोन चे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र मध्ये असून केंद्र आणि राज्य अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार ओमायक्रॉनचे महाराष्ट्र – 54, दिल्ली 24, राजस्थान 17, कर्नाटक 14, तेलंगणा 20, गुजरात 15, केरळ 11 तर आंध्र प्रदेश, चंदीगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आज दिल्ली येथे ओमीक्रोन चे 2 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील ओमिक्रोनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 24 झाली असून दिल्लीच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, 24 रुग्णांपैकी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 12 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Leave a Comment