हनीमूनला गेल्यावर कळले की, नवरा ट्रान्सजेंडर आहे, आता पुन्हा होणार लग्न, दोघेही असणार नववधू

लंडन । ब्रिटनमध्ये एक जोडपे पुन्हा लग्न करणार आहेत. खास गोष्ट म्हणजे अशी की या वेळी हे लग्न कोणत्याही वराबरोबर होणार नाही तर दोघेही नववधू म्हणून एकमेकांचा हात धरणार आहेत. पूर्वी वर असलेली व्यक्ती आता वधू होणार आहे. खास गोष्ट अशी आहे की, दोघे नववधू म्हणून एकमेकांशी लग्न करतील. या वधू-वरच्या प्रकरणात तुमचा जरा गोंधळ उडाला असेल तर ते प्रकरण नक्की काय आहे ते समजावून घ्या.

त्याचं झालं असं की हनीमूनवर गेल्यावर त्या मुलीला कळलं की, तिचा नवरा ट्रान्सजेंडर आहे. जे आणि रायन यांचे लग्न 2018 साली अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झाले होते. सध्या दोघेही यूकेमध्ये राहतात. ब्रिटिश वृत्तपत्र ‘मिरर’ शी बोलताना रायन म्हणाला की, तो 11 वर्षांचा असल्यापासून एक स्त्री होण्याचा विचार करीत होतो. आता लग्नानंतर आपल्या बायकोला ही गोष्ट सांगितल्यानंतर त्याला खूप हलकं आणि मोकळं वाटत आहे.

रायनने आपले लिंग बदलण्यासाठी शस्त्रक्रिया केली. यात त्याने 45 हजार पौंड म्हणजेच सुमारे 46 लाख रुपये खर्च केले आहेत. आता दोघेही खूप आनंदी आहेत आणि दोघे सप्टेंबरमध्ये पुन्हा लग्न करणार आहेत. त्याच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली आहे. याकरिता विशेष कपडेही तयार केले जात आहेत. याशिवाय दोघांची फॅमिलीही खूप आनंदी आहेत.

दोघेही 2007 मध्ये ऑनलाइन भेटले होते. त्यानंतर, 2017 मध्ये दोघे एकमेकांना भेटले. यानंतर मार्च 2018 मध्ये हे लग्न झाले. या दरम्यान सुमारे 30 पाहुणे देखील हजर झाले होते. मात्र यावेळी लग्नात जास्त पाहुणे पोहोचण्याची त्यांना अपेक्षा आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like