पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाऊसाने साचलेल्या पाण्यात चारचाकी गाडी बुडाली; पहा थरारक Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : पश्चिम महाराष्ट्रात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर कराड जवळ पाऊसाचे पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा झाला आहे. गुरुवारी पहाटे कराडजवळ पाऊसाने साचलेल्या पाण्यात एक चारचाकी गाडी बुडाली आहे. महामार्गावरुन फक्त मोठ्या वाहनांना जाऊ दिले जात असून चारचाकी व दुचाकींसाठी रस्ता वळवून दिला होता. मात्र आता सकाळी 11:30 नंतर सर्व वाहनांसाठी वाहतुक मोकळी करण्यात आली आहे.

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाऊसाने साचलेल्या पाण्यात चारचाकी गाडी बुडाली; पहा थरारक Video

हाती आलेल्या माहितीनुसार, कराड शहराजवळ असणाऱ्या गोटे गावात राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आले आहे. या पावसाच्या पाण्यात एका चारचाकी चालकाला माहिती नसल्यामुळे व अंदाज न आल्याने गाडी बुडाली आहे. हायवे पोलीस व कराड तालुका वाहतूक पोलीस यांनी या मार्गावरील वाहतूक छोट्या चारचाकी वाहनांसाठी व दुचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. केवळ बस, मोठे ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हल्स यांच्यासाठी वाहतूक चालू होती. पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली होती.

गोटे येथे पाण्यात बुडालेली चार चाकी ही इचलकरंजी येथील असून सदरील व्यक्ती शिरवळ येथे कामानिमित्त निघाले होते. या वेळी अंदाज न आल्याने व पावसाचे पाणी महामार्गावर असल्याची कल्पना चालकाला नव्हती. गाडी पाण्यावर तरंगत असताना गाडीची काच खाली करून बाहेर पडल्याचे चालकांनी सांगितले.

Leave a Comment