प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कर्ज काढून नुकसानग्रस्तांना मदत करावी : नाना पटोले यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या भागाची आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पाहणी केली जात आहे. यादरम्यान त्यांनी मिरकवाडा बंदराला भेट दिली. तेथील भेटीनंतर पटोले यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. “येथील नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्ज काढावे. कोणत्याही परिस्थितीत येथील लोकांना मदत करावी,” अशी मागणी पटोले यांनी केली.

तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेल्या कोकणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसकडूनही येथील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रत्नागिरीत व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज असून या दरम्यान त्यांच्याकडून विविध नुकसानग्रस्त भागांना भेट दिली जात आहे. दरम्यान त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी जाऊन मच्छीमारांची व विविध नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तसेच त्यांच्याशी संवादही साधला.

भाजप व शिवसेनेनंतर आता काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली जात आहे. या ठिकाणी पाहणी करण्यासाठी दाखल झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी भूमिका काँग्रेसची आहे, अशी माहिती माध्यमप्रतिनिधींशी साधलेल्या संवादावेळी दिली. यावेळी पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. भारताचे पंतप्रधान हे काय फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? असा सवालही पटोले यांनी यावेळी विचारला.

Leave a Comment