औरंगाबाद | रिलायन्स जिओ कंपनी मध्ये सुरक्षारक्षकांना लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी सुरक्षारक्षकांना मारहाण करून कंपनीत असलेल्या सुमारे दीड लाख रुपयाचे केबल आणि हँमरिंग ड्रिल मशीन चोरून नेले होते.
रांजनगाव, कमळापूर रोड या ठिकाणी राहणाऱ्या अमोल खरात (20) आणि हिदायत नगर, वाळूज येथे राहणाऱ्या सय्यद अनिस सय्यद हे या प्रकरणातील आरोपी आहेत. या प्रकरणी हरिषा सोसायटी साऊथ सिटी या ठिकाणी राहणाऱ्या शाम कुंभकर्ण यांच्या फिर्यादी वरून एमआयडिसी वाळूज पोलिसांनी शनिवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदांडाधिकारी बी. एम पोतदार यांनी या आरोपींना 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी रिलायन्स जिओ कंपनी च्या आवारात रात्रीच्या सुमारास पवन लंबे आणि शिवाजी पोपटघट हे दोघे सुरक्षाराक्षकाची नोकरी करत होते. यावेळी कंपनीची कंपाउंड जाळी तोडून आत घुसलेल्या तिघांनी शिवाजी पोपळघट यांना केबलने मारहाण करून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला त्यानंतर त्यांनी दोघांना केबिनमध्ये कोंडून ठेवत केबल आणि दोन हजाराची हॅमर ड्रिल मशीन रिक्षात टाकून ते पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून पोलिसांनी चौकशी केली असता चोरलेले केबल आणि हॅमर ड्रिल मशीन सय्यद आणि त्यांच्या लोडिंग रिक्षा टाकून साथीदार संतोष कांबळे यांनी भंगारवाल्याला विक्री केल्याचे आरोपी यांनी कबूल केले.