दीड वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, ‘या’ शहरामध्ये आहेत लाखो भटके कुत्रे; यामुळे वाढली संख्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जबलपूर | जबलपूर शहरामधील काठौदा येथे एक हृदयद्रावक घटना घडली. याठिकाणी गल्लीतील भटक्या कुत्र्यांनी दीड वर्षाच्या लहान मुलीवर हल्ला केला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाच्या भटके श्वान विरोधक योजनेवरही प्रश्नचिन्ह उभारले जात आहे.

काठौदामधील दीडवर्षाची दिपाली आपल्या घराबाहेर भावासोबत खेळत होती. त्यावेळी 5-6 भटक्या कुत्र्यांनी दिपालीवरती हल्ला केला. ती मोठ्याने ओरडू लागल्यामुळे दिपालीची आई घरातून बाहेर पळत आली. आणि कुत्र्यांना पळवून लावले. पण तोपर्यंत दिपाली मोठ्या प्रमाणात गंभीर घायाळ झाली होती. यानंतर कुटुंबाने मुलीला हॉस्पिटलमध्ये भरती केले पण एक दिवसानंतर तिचा जीव गेला.

काठौदामध्ये मृत प्राण्यांची कातडी उतरवली जाते. यामुळे भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वावर आहे. स्थानिक प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीकरिता वेगवेगळे ठेके दिले होते. सध्या नसबंदीकरिता प्रति कुत्र्यानुसार सातशे रुपये दिले जातात व सध्याच्या आकडेवारीनुसार काठौदा शहरामध्ये जवळपास एक लाख भटके कुत्रे आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment