फायनान्स कार्यालयात पैशाच्या वादात एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर | चाकूर तालुक्यातील घरणी येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका फायनान्स कार्यालयात पैसे देणे घेण्यावरून भांडण चालू झाले. आणि या भांडणांमध्ये हाताला काच लागल्याने एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना चाकुरमध्ये घडली आहे.

पद्माकर माधवराव बोईनवाड (43 रा. घरणी) मिळालेल्या माहितीनुसार पैशाच्या देण्याघेण्याच्या भांडणावरून पद्याकर यांचा हात काचेवर पडला, आणि हाताला मार लागला. हातात घुसल्याने नस तुटली आणि रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे उपचारासाठी लातूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान 24 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला शवविच्छेदन करून घरणी येथे 25 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून अनिल संग्राम पोटे (35 रा.घरणी) यांना अटक करून यांच्यावर चाकूर पोलिसात गुरनं 386/ 21, 304 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट हे करत आहेत.

Leave a Comment