ओमिक्रॉनचा फैलाव वाढला; देशात अजून 1 रुग्ण सापडला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना चा नवा व्हेरीएन्ट असलेला ओमीक्रोनचा देशात हळूहळू फैलाव होताना दिसत आहे. कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र नंतर आता दिल्लीत ओमिक्रॉनचा ओमीक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. सदर व्यक्तीला लोकनायक जयप्रकाश नारायण (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली आहे.

दिल्लीतील 12 लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. त्यापैकी एक ओमीक्रोन पॉझिटिव्ह असल्याचे समजते. टांझानिया येथून हा रुग्ण काही दिवसांपूर्वी दिल्लीत दाखल झाला होता. तसेच परदेशातून आलेल्या 17 जणांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.

दरम्यान, यापूर्वी कर्नाटक येथे 2 तर गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 1 ओमिक्रोन रुग्ण आढळला होता. त्यामुळे देशात हळूहळू ओमीक्रोन फैलाव वाढण्याची चिन्हे आहेत.