राज्यात एका भगिनीचा जीव गेला, सगळा महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. वनमंत्री संजय राठोड यांचं नावं सतत त्या प्रकरणाशी जोडलं जातंय. या प्रकरणावर १५ दिवस मौन धरल्यानंतर राठोड यांनी काल पोहरादेवी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत बदनामी केली जात असल्याचा दावा केला.

मात्र, राज्यात करोनाचं संकट गडद होत असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावरून भाजपाकडून शिवसेनेला कोडींत पकडण्याचा प्रयत्न होत आहेत. “करोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही,” असा टोला लगावत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“करोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही. एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे… तो मी नव्हेच,” अशी टीका शेलारांनी केली आहे.

दरम्यान, संजय राठोड यांनी काल केलेल्या शक्ती प्रदर्शनाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागलीच दखल घेत. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच कोणी कितीही जवळचा असला तरी गुन्हा केला असेल तर त्याला सोडणार नाही ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

You might also like