लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं असं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. पण, सरकारला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही आहे. अजूनही लोकल आणि बसेसमध्ये गर्दी दिसून येत आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील भार कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रसंगी कठोर निर्णय घेतले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा, सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नका, सरकारने दिलेल्या सूचना पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. मात्र, त्याचा परिणाम आंशिक परिणाम लोकलच्या गर्दीवर पाहायला मिळत आहे. लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. सरकारी यंत्रणा करोनाविरोधात सक्षम आहेत. फक्त नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं. ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य द्यावं. लोकल, बस सेवेतील ताण कमी करावा, जेणेकरून आपल्याला करोनावर मात करता येईल, असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. तरी सुद्धा लोकलच्या गर्दीत कमी होताना दिसत नाही आहे. अजूनही ७० टक्के प्रवासी लोकलने प्रवास करताना दिसत आहे.

राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी यात भर पडली असून, करोना बाधितांचा आकडा ५२ वर पोहोचला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे करोनाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण बरे झालेले असून त्यांना लवकरच सुटी दिली जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. यावेळी टोपे यांनी मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याबद्दलही भाष्य केलं.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment