नरेंद्र मोदींनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं ; चंद्रकांतदादांचं अजब वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एक वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. परंतु चंद्रकांत दादांनी आता एक अजब विधान केले आहे.नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, अस वक्तव्य केलं आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य त्यांनी केलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आपला सगळ्या मुस्लिलांना विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध असल्याचं सांगितलं. मात्र काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.

मोदींनी मुस्लीम महिलांच्या पायातली बेडी तोडली

मोदींनी मुस्लिम समाजतल्या महिलांच्या पायातली बेडी तोडली. तीन तलाकचा कायदा रद्द केला. बिहारच्या विजयाच्या विश्लेशन केलं तर लक्षात येईल की बिहारच्या मुस्लिम महिलांनी मोदींना रांगेनं मतदान केलं. असंही ते म्हणाले

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’