दार उघड उद्धवा दार उघड म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मंदिराचे दारे बंद आहेत. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असताना बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मग मंदिरे का बंद असा प्रश्न उपस्थित करत वेरुळ येथील आंदोलन करण्यात आले आहे. घृष्णेश्वर मंदिरासमोर भाजप अध्यात्मिक आघाडीने आंदोलन केले.

भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले म्हणाले की, आम्ही आता मुख्यमंत्र्यांना नाही तर महादेवाला साकड घालू की या सरकारला चांगली बुध्दी दे आणि देवा तुझी कवाड भाविकांसाठी उघडी करू दे. मंदिर बंद ठेवणे म्हणजे हा हिंदू धर्मीयावर अत्याचार आहे. त्याचबरोबर ज्या लोकांचे जनजीवन हे तीर्थक्षेत्रावर अवलंबून आहे. त्यांनी आता काय जीव द्यावा का ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पहिल्या श्रावण सोमवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करण्यात आले. आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. पुढील आठ दिवसात म्हणजेच तिसऱ्या सोमवार पर्यंत जर सरकारने मंदिर उघडी नाही केली तर, आम्ही आंदोलनाची भूमिका यापेक्षा आक्रमक करू असेही ते म्हणाले. यावेळी दार उघड उद्धवा दार उघड, हर हर महादेव, जय भवानी ज शिवाजी, भाजप आघाडीचा विजय असो. अशी घोषणाबाजी करण आली.

Leave a Comment