Oppo A17 : 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी; Oppo ने लॉन्च केला बजेट स्मार्टफोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध स्मार्टफोन (Oppo A17) निर्माता कंपनी Oppo ने आपला नवीन स्मार्टफोन Oppo A17 बजेट किमतीत लॉन्च केला आहे. ओप्पोच्या ए-सीरीजचा हा मोबाईल लेदर डिझाइनसह दोन रंगांच्या पर्यायांमध्ये मिळू शकेल. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोन मधील काही खास वैशिष्टये आणि किमतीबाबत ….

6.56-इंचाचा डिस्प्ले-

Oppo च्या मोबाईलला 6.56-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे. हा मोबाईल ड्युअल सिम स्लॉटसह येत असून Android 12 वर आधारित ColorOS 12.1.1 वर चालतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio G35 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 4 GB रॅम उपलब्ध आहे. फ्री स्टोरेज वापरून फोनची रॅम 8GB पर्यंत वाढवता येते.

Oppo A17

50MP कॅमेरा- (Oppo A17)

मोबाईलच्या कॅमेराबाबत (Oppo A17) बोलायचं झाल्यास, या ओप्पो स्मार्टफोनला डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी मोबाइलला 5 मेगापिक्सेचा फ्रंट कॅमेरा आहे.

Oppo A17

5,000mAh बॅटरी –

कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 5, Bluetooth v5.3, GPS/ A-GPS, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक समाविष्ट आहे. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. तसेच फेस अनलॉक फीचरही या मोबाइलला देण्यात आलं आहे . Oppo A17 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे. हा मोबाईल वॉटर रेझिस्टंट देखील आहे, कारण त्याला IPX4 रेटिंग मिळाले आहे.

Oppo A17

किंमत –

मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, हा स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये भारतात लॉन्च झाला असून त्याची किंमत 12,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक आणि सनलाइट ऑरेंज कलरमध्ये मिळू शकेल . मोबाइल खरेदी करताना काही ऑफर्सही तुम्हाला मिळू शकतात. या अंतर्गत, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक बँक कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 1,500 रुपयांची त्वरित सूट दिली जाईल.

हे पण वाचा :

WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या

200MP कॅमेरासह Xiaomi ने लॉन्च केले 2 दमदार स्मार्टफोन; पहा किंमत

Moto G72 : Motorola ने लॉन्च केला 108 MP कॅमेराचा दमदार स्मार्टफोन; पहा किंमत

Telegram ने भारतीय युझर्ससाठी प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत केली कमी

Prepaid Plans : टेलिकॉम कंपन्यांच्या या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या