कराडला कोटा अकॅडमीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संंधी : पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | अमेरिकेसारखे राष्ट्र फक्त गुणवत्तेची काळजी घेतात तू कुठला मुलगा भारत, चीन, जपान, पाकिस्तान हे न बघता गुणवत्ता किती आहे. गुणवत्तेच्या आधारावर आपल्या कंपनीमध्ये तू किती भर टाकू शकेल तो किती मदत करू शकेल. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती भर टाकेल, याचा विचार करतात. महेश खुस्पे आणि साै. मंजिरी खुस्पे या दोघांनी चांगला निर्णय घेतला. आपल्या परिसरातल्या जास्तीत जास्त मुला-मुलींना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी कोटा अकॅडमीने दिली असल्याचे उदगार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.

कराड येथे कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर काॅलेज आॅफ सायन्य काॅलेजचे नवीन वास्तूत स्थलांतर सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष डाॅ. महेश खुस्पे, संस्थापक उपाध्यक्ष साै. मंजिरी खुस्पे, विशेष सरकारी वकिल व सचिव अॅड. सतिश पाटील, प्राचार्या जयश्री पवार याच्यासह लायन क्लबचे पदाधिकारी व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

अध्यक्ष डाॅ. महेश खुस्पे म्हणाले, आमच्या संस्थेने शेकडो विद्यार्थी घडविण्याचे काम केले. आयआयटीत 250 च्या वर विद्यार्थी आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली सुसज्ज इमारत उभी केल्याचे समाधान आहे. कराड सारख्या शहरात गेल्या 16 वर्षात अनेक चढ- उतार बघितले. परंतु सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची शिदोरी देवून उच्च पदावर बघताना आनंदही होत आहे.

उपाध्यक्षा साै. मंजिरी खुस्पे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ही संस्था नविन वास्तूत स्थलांतरित होत आहे, यांचा आम्हांला अभिमान वाटतो. 16 वर्षांनंतर हे यश मिळाले आहे. कोटा अकॅडमीने क्वान्टींटी नाही तर क्वालिटीला महत्व दिले. आमच्या संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त आहेत. आता 9 वी ते 12 वी काॅलेजला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थी परिपूर्ण ज्ञान घेवूनच कोटा अकॅडमीतून बाहेर पडेल.

सुत्रसंचालक नईम कागदी यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव ॲड. सतीश पाटील यांनी केले. तर आभार संचालिका मैथिली खुस्पे यांनी मानले.

कोटा अकॅडमीच्या शिक्षकांचा गौरव

कोटा अकॅडमीत गेल्या अनेक वर्षापासून ज्ञानदान देण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गाैरव करण्यात आला. यामध्ये सारिका पाटील, सन्ना संदे, अष्टमी मडगर, जितेंद्र कुमार, संदिप रानमाळे, विश्वदिप बँनर्जी, अमनराज, महेशसिंग राजपूत यांचा समावेश होता. यामधील अनेक शिक्षक हे परराज्यातील उच्च शिक्षित आहेत.

 

Leave a Comment