भारतीय डाक विभागाकडून हजारो रुपये कमवण्याची संधी, कसे ते वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आजच्या कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर एखादा व्यवसाय सुरु करण्याचा म्हणजे मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेलं भांडवल तयार करणे हे सर्वात मुश्किल काम आहे. आणि व्यवसायात असलेले धोके यावर मात करत टिकून राहणे हे सर्वात अवघड गोष्ट आहे.
एखादा छोटा व्यवसाय सुरु करायचा म्हंटल तरी त्यासाठी १लाखो रुपये लागतात. पण जर कमी पैश्यात चांगले कमवण्याची संधी मिळाली तर सर्वानाच आवडेल . पोस्ट ऑफिस ने हि संधी सर्वाना उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट ऑफिस सोबत काम करत खूप चांगले पैसे कमवू शकतो. जाणून घ्या पोस्ट ऑफिस च्या संधीबाबत

भारताच्या डाक विभागाने पोस्ट ऑफिसची शाखा सुरु करण्यासाठी लोकांना निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून लोक फक्त ५००० रु भरून नवीन शाखा सुरु करू शकतात.

पोस्ट ऑफिस च्या शाखा का लोकांना व्यवसायासाठी दिल्या जात आहेत?
संपूर्ण देशात जवळपास पोस्ट ऑफिस च्या १. ५५ लाख शाखा आहेत. अगदी शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत पोस्ट ऑफिस पोहचले आहे. पोस्ट ऑफिस चे नेटवर्क जबरदस्त आहे. परंतु ज्या भागात पोस्ट ऑफिस पोहचलं नाही किंवा तेथे पोस्ट ऑफिस च्या सेवा दिल्या जात नाहीत त्या ठिकाणी ते लोकांना शाखा खुली करण्यासाठी संधी देत आहे. दरमहा ५००० रु भरून सर्वसामान्य व्यक्ती शाखा खोलू शकतो. आणि त्यातून बरीच कमाई करू शकतो.

पोस्ट ऑफिस ने दोन प्रकारच्या शाखा सुरु करण्याची संधी दिली आहे. त्यामध्ये पहिली म्हणजे दुसऱ्या भागात शाखा सुरु करणे किंवा पोस्टल एजन्ट शाखा सुरु करणे. या दोघांमधील कोणतीही एक शाखा भारतीय डाक विभागाच्या अधिपत्याखाली सुरु करू शकतो.

दोन्ही शाखांमध्ये काय फरक आहे?

पहिल्या शाखेमध्ये भारतीय डाक विभाग जिथे शाखा नाही तेथे सुरु करू पाहत आहे. कि जिथे डाक विभाग छोट्या छोट्या गोष्टींची सेवा परवु शकतो. तसेच एजन्ट शाखा शहर किंवा ग्रामीण भागात सुरु करू शकतो. ते ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन सेवा देऊ शकते. हे शाखा घेणारा कोणताही व्यक्ती कमीत कमी १८ वर्षाची असली पाहिजे. आणि त्याचे शिक्षण ८वी पास असला पाहिजे.

सुरुवातीला ५००० रुपये भरून आपण पोस्ट ऑफिस चा एक भाग होऊ शकतो. पोस्ट ऑफिस चे साहित्य जितके घरपोहच करू शकता आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यावर तुमचे कमिशन ठरणार आहे. यातून आपण हजारो रुपये मिळवू शकता.
पोस्ट एजन्ट च्या माध्यमातून ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना सोयी पुरवायच्या आहेत. ग्राहकांना आवश्यक असललेल स्पीड पोस्ट , मनिऑर्डर, बुक अश्या सेवा देऊ शकता. आजकाल पोस्ट एजन्ट ला जास्त महत्व प्राप्त झाले आहे.

शाखा खोलायची असेल तर भारतीय डाक विभागामध्ये एक अप्लिकेशन दयावे लागणार आहे.

https://www.indiapost.gov in/ VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf या लिंक वर जाऊन अर्ज करायचा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment