ओमायक्रॉनची उत्पत्ती उंदरांमधून?? शास्त्रज्ञांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या जगभरात ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टचे रुग्ण आढळत आहेत. भारतातही ओमायक्रोनच्या रुपात कोरोनाची तिसरी लाट आली असून अनेक रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्याच दरम्यान, ओमायक्रोनबाबत नवी माहिती समोर आली असून ओमायक्रॉनची उत्पत्ती उंदरांमधून झाली असल्याचे शास्त्रज्ञांच्या अभ्यासात दिसले आहे.

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची उत्पत्ती उंदरांमधून झाली असावी अशी शक्यता चिनी शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. कोरोना विषाणू माणसांमधून उंदरांपर्यंत पोहोचला आणि मग अनेक म्युटेशननंतर माणसांमध्ये परत आला, याबद्दलचे पुरावे चिनी शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. माणसांमध्ये सापडलेले ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पाच व्हेरिएंट उंदरांच्या फुफ्फुसांमध्ये सापडलेल्या म्युटेशनसारखेच असल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे.

रिसर्चमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या इतर व्हेरियंटमध्येही नसतील. माणसामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे पाच म्युटेशन आढळलेत, जे उंदराच्या फुफसामध्ये आढळलेल्या म्युटेशनसारखे आहेत. संशोधकांच्या अनुसार, ओमायक्रॉनची उत्पत्तीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ओमायक्रॉनचे आतापर्यंत 50 पेक्षा जास्त म्युटेशन आढळले आहेत.