अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुक लॉन्च करणार ‘हे’ खास फिचर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच कोरोनासंदर्भातील अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरस केल्या जातात. आता खोटी माहिती आणि अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुकने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक ‘गेट्स द फॅक्ट’ नावाचं फिचर घेऊन येणार आहे. या फिचरमुळे खोटी माहिती आणि अफवा पसरवणं थांबवण्यास मदत मिळणार आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने याबाबत माहिती देताना सांगितलं की,’ आम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोरोना व्हायरसबाबत लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवून खोट्या माहितीवर लगाम लावण्यावर काम करत आहोत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच अफवांना आळा घालण्यासाठी काम करत आहोत. आता आम्ही जवळपास 12 देशांमध्ये 60 पेक्षा जास्त फॅक्ट चेक संस्थांसोबत एकत्र येऊन 50 भाषांमध्ये पसरणाऱ्या अफवा थांबवण्याचं काम करत आहोत. माहिती खोटी किंवा खरी असल्यास त्यावर लेबलही लावण्यात येणार आहे असं झुकरबर्गने स्पष्ट केलं.

तसेच कंपनीने यापुढे जाऊन अफवा किंवा खोट्या माहितीला रोखण्यासाठी फेसबुकने आणखी एक फिचर आणलं आहे. फेसबुक ‘गेट्स द फॅक्ट’ या नावाचं एक फइचर लॉन्च करणार आहोत. जे मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती आणि अफवांवर लगाम लावण्याचं काम करणार आहे. फेसबुकच्या ज्या युजर्सकडे आतापर्यंत खोटी माहिती पोहोचली आहे. आम्ही त्यांना मेसेज पाठवून त्यासंदर्भातील खरी माहिती पुरवणार आहोत असही झुकरबर्गने सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment