व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उसतोड मजुरांच्या टेम्पो ट्रकला भीषण अपघात, ७ ठार १५ जखमी

उस्मानाबाद प्रतिनिधी । उस्मानाबाद येथे मजूर घेऊन जाणारी गाडी धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे अपघात होऊन ७ ठार १५ जखमी झाल्याचे वृत्त आहे. पहाटेची घटना जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उसतोडीसाठी उस्मानाबाद येथे जात असलेल्या मजुरांनी भरलेला टेम्पो ट्रक पुलावरून नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण गंभीर जखमी असून, अन्य ७ किरकोळ जखमी झाले आहेत, मयतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश प्रामुख्याने आहे, धुळे सोलापूर महामार्गावरील हे दुर्घटना असून बोरी नदीच्या पुलावरून हा अपघात झाला आहे.

या अपघातातील मयत हे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील मजूर आहेत. अरुंद पुलाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या रास्ता खडेमय असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना  चांगलीच कसरत करावी लागते.